लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित मालिका लवकरच या मराठी चॅनेलवर.
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे मोठाले पोस्टर गेली काही दिवस मुंबईत लावण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या राजकीय गोंधळाच्या वातावरणात हे पोस्टर कुणी लावले आणि नेमका अर्थ काय अशा चर्चाना उधाण आले होते. मात्रा आता त्याचा उलगडा झाला आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करत इंग्रज सरकारला धारेवर धरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर नवी मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. बदल घडत नाही तो घडवावा लागतो, या दिशेने प्रवास करणाऱ्या झी मराठी वाहिनीने हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, अशा लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा ‘लोकमान्य’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनी घेऊन येत आहेत.A series based on the life of Lokmanya Tilak will soon be on this Marathi channel.
लोकमान्यांचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे. पण लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ह्या मालिकेचं लेखक आशुतोष परांडकर असून स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्माते आहेत. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ही मालिका २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
ML/KA/PGB
21 Nov .2022