आयुष्यभर ईतरांचे बुट चमकावणाऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक.

 आयुष्यभर ईतरांचे बुट चमकावणाऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक.

वाशिम, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील पाच दशकांपासून  वाशीम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बुट पॉलीश करण्याच्या आपल्या पारंपारीक व्यवसायातून कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे रामभाऊ खंदारे यांचा उच्च शिक्षीत मुलगा दिपक खंडारे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे.A sales tax inspector

आयुष्यभर आपल्या व्यवसायातून ईतरांची फाटलेली चप्पल शिवून तसेच बुट पॉलिश करणाऱ्या बापाच्या स्वप्नाला दिपकच्या विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याने झळाळी मिळाली आहे.

दिपकचे वडील रामभाऊ खंदारे यांचेकडे शेती नाही. दारिद्रय रेषेखालील जीवन जगत असतांना बुट पॉलीश व्यवसायातून ते कुटूंबाचा आजही चरितार्थ चालवितात. आपण शिक्षण घेऊ शकलो नसलो तरी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन त्याला चांगल्या नोकरीतील पदावर बसलेले बघणे हे त्यांचे स्वप्न दिपकने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर जाऊन पुर्ण केले आहे. दिपकची आई तुळसाबाई हया देखील घरातील काम सांभाळून तेलाच्या घाण्यात काम करुन संसाराला हातभार लावत आहे.

घरात अठरा विश्व् दारिद्र्य, उदरनिर्वाह करण्याचा कोणताच मार्ग नाही, वडिलोपार्जित शेती नाही या परिस्थितीत कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी रामभाऊ सीताराम खंदारे पारंपरिक बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय मागील ५० वर्षांपासून करतात. मुलगा दीपक याने सुद्धा आई वडिलांच्या कठीण परिश्रमाचे जाणीव आणि विश्वास सार्थ ठरवीत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

आपण जरी शिकलो नसलो, तरी मात्र आपल्या मुलांनी शिकावं, शासकीय नोकरी करावी हे स्वप्न उराशी बागळून आपला मुलगा दीपक याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रामभाऊ अहोरात्र मेहनत करीत होते. आज मुलाच्या उत्तूंग भरारीमुळे सर्व स्तरातुन दिपकसह त्याच्या आई वडीलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, “तु फक्त शिक तुला काहीच कमी पडू देत नाही” असे दीपकचे आई वडील म्हणायचे,आई वडिलांच्या आधार देणाऱ्या शब्दामध्ये किती बळ असते हे दिपकच्या यशातून सिद्ध होते.

ML/KA/PGB
27 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *