मनोरुग्ण महिलेने घेतले एसटीचे स्टीअरिंग हातात; उडाली एकच खळबळ.

 मनोरुग्ण महिलेने घेतले एसटीचे स्टीअरिंग हातात; उडाली एकच खळबळ.

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशिम बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बस चे स्टीअरिंग एका मनोरुग्ण महिलेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली. बस स्थानकावर रिसोड जाणारी बस क्र एम एच ०६ – एस ८०४७ ही बस उभी करून चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक मनोरुग्ण महिला बसच्या केबिन मध्ये घुसली आणि तिने स्टीअरिंग चा ताबा घेतला. A psychotic woman takes the steering wheel of ST; There was a sensation.

त्याच बसमध्ये प्रवाशी बसत असल्याने काही वेळ हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही मात्र बस स्थानकावरील एका वाहकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
त्या नंतर एसटीचे सुरक्षा रक्षक, चालक आणि वाहकाने या महिलेला स्टीअरिंग वरून खाली उतरण्याची विनंती केली मात्र ती ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हती अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षा रक्षकांनी त्या मनोरुग्ण महिलेला बसच्या खाली उतरविल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अनेक एसटी बसेसला सुरू किंवा बंद करण्यासाठी चावी नसते त्या बस विना चावी बटणावर सुरू होतात. सुदैवाने चालकाने बसची चावी काढून बटन बंद केले होते जर त्या बसला चावी असती तर ती बस त्या मनोरुग्ण माहिलेने सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ घडला असता. या घटने मुळे एसटी बस गाड्यांमधील चालकांच्या कॅबिनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ML/KA/PGB
10 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *