बैलांची छान सजावट करुन काढली डीजेच्या तालावर मिरवणूक…
नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात खेड्यापाड्यात आज शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण साजरा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा निस्सिम मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही काही शेतकऱ्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालनपोषण करतात. अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेताना दिसतात.
आज पोळा असल्याने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बैलांची छान सजावट करुन रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून गावातून गुलाल उधळत डिजेच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी त्यांना पुरणपोळीची मेजवानी मेजवानी देण्यात आली. गावातून मिरवून आणल्यानंतर बैलांचे घरातील सुवासिनी स्रियानी त्यांचे ओक्षण करून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
ML/KA/SL
14 Sept. 2023