खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरची झाली एमर्जेंसी लँडिंग…
जालना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील चनेवाडी शिवारात एका हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली त्यामुळे ते पाहायला स्थानिकांनी मोठी गर्दी केली .सदर हेलिकॉप्टर छत्रपती संभाजी नगर येथून रवाना होऊन नागपूरकडे खाजगी कामानिमित्त जात होते. यादरम्यान हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब पायलट इम्रान गौरी यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी तातडीने हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केली.
मल्होत्रा हेलिकॉप्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हेलिकॉप्टर काही खासगी कामानिमित्त जात नागपूर कडे निघाले होते. मात्र हेलिकॉप्टर मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलट इम्रान गौरी आणि त्यांच्या सोबतचे नवीन राजाराम सिंग यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन हेलिकॉप्टरची इमर्गेन्सी लँडिंग केली त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.
पायलट इम्रान गौरी यांनी कंपनीची मदत घेऊन सदरचे हेलिकॉप्टर परत सुरू केले, त्यांनंतर ते छत्रपती संभाजीनगर कडे घेऊन रवाना झाले. दरम्यान हेलिकॉप्टरची अचानक लँडिंग झाल्याने नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.
ML/ML/SL
29 April 2024