राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणार पोलीस चौकी

 राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणार पोलीस चौकी

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नु

कतेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विशेष बैठक घेऊन प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याच्या सूचना विभागाला दिल्या. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलिस चौकी उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

SL/ML/SL
2 Mach 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *