औरंगाबाद खंडपीठात बॉम्ब ठेवल्याचा फोन
औरंगाबाद, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटनर्क) : न्याय न मिळाल्याने हिडन ॲप चा वापर करीत एका अज्ञात व्यक्तीने फोन कॉलने औरंगाबाद शहर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती.
‘पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया’ असे सांगणारा निनावी फोन शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आला. फोन करणाऱ्याने शहरातील एका वकिलाचे नाव आणि मोबाइल नंबर सांगून फोन कट केला.
त्यानंतर शहर पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. बॉम्बशोधक नाशक पथकासह हायकोर्ट सुरक्षा, पुंडलिकनगर ठाण्याच्या पोलिसांनी खंडपीठात धाव घेतली. मात्र श्वानांनी सर्व परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ML/KA/SL
15 Feb. 2023