सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती
सिंगापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम यांनी चिनी वंशाच्या दोन विरोधकांना पराभूत करत सिंगापूरच्या ९ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. काल झालेल्या मतदानात थर्मन यांना 70.4% मते मिळाली, तर त्यांचे विरोधक एनजी कोक संग यांना १५.७२% आणि टॅन किन लियान यांना १३.८८% मते मिळाली. थर्मन यांना दोघांच्याही दुप्पट मते मिळाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की ते अध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या यशाने पार पाडतील
थर्मन हे अध्यक्षपदासाठी निवडून आलेले पहिले भारतीय आहेत. त्याचबरोबर सिंगापूरचे भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती बनले आहेत. १९८१ मध्ये संसदेत निवडून आलेले देवेन नायर राष्ट्रपती झाले. एस. आर. नाथन यांनी 1999 ते 2011 अशी ११ वर्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९१ पासून सामान्य जनता मतदानाद्वारे राष्ट्रपतीची निवड करते.
२५ फेब्रुवारी १९५७ रोजी सिंगापूरमध्ये जन्मलेले थर्मन हे केंब्रिजचे अर्थशास्त्रज्ञ असून सिंगापूरचे ‘पॉलिसी मेकर’ म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे आजोबा तामिळनाडूतून स्थलांतरित होऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झाले. थर्मन यांचे वडील प्रा.के. षण्मुगररत्नम जे वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. ज्यांना सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक मानले जाते.थर्मन यांची पत्नी जेन इटोगी चिनी-जपानी वंशाची आहेत.
ML/KA/SL
2 Sept. 2023