कोणत्याही सण-प्रसंगांसाठी हे एक परिपूर्ण गोड, रवा आणि खोबर्‍याचे लाडू

 कोणत्याही सण-प्रसंगांसाठी हे एक परिपूर्ण गोड, रवा आणि खोबर्‍याचे लाडू

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक साधी भारतीय गोड रेसिपी जी काही मिनिटांत आणि आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या साध्या पदार्थांसह तयार केली जाऊ शकते. या रेसिपीमध्ये समाविष्ट केलेले मूलभूत घटक म्हणजे साखर, रवा/रवा आणि नारळ. दिवाळी साजरी करण्यासाठी किंवा कोणत्याही सण आणि प्रसंगांसाठी हे एक परिपूर्ण गोड आहे.

लागणारे जिन्नस:
चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते) एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू (आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती:
भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.


पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.

दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. A perfect sweet, semolina and coconut ladle for any festive occasion

PGB/ML/PGB
27 Sep 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *