केंद्रीय कृषीमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल

 केंद्रीय कृषीमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली.दि. ११ : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मागणारा प्रस्ताव आला आहे, असे असत्य विधान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केल्याचा आरोप करत ओम राजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्क भंग दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या 25 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिवृष्टी अनुदानावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2 डिसेंबर रोजी संसदेत लेखी उत्तरात माहिती दिली. सोबतच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आले. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला. कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलं आहे.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे 75.42 लाख हेक्टर वरील पिकाचे नुकसान, तर 3598 घरांचे नुकसान झालं आहे. महापुराच्या विळख्यात 224 लोकांचा मृत्यू, तर 599 जनावर मृत्युमुखी पडल्याची लेखी उत्तरात माहिती आहे. दरम्यान, केंद्र सरकारनेच स्पष्टपणे याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने प्रस्ताव वेळेत दिला असता तर तात्काळ मदत मिळण्यास मोठी मदत झाली असती, असे ओमराजे यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. त्यावरुन, विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे, राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार कृषिमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत ओमराजे निंबाळकर यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही. लोकसभेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या तारांकित प्रश्नाला केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच लेखी उत्तर दिलं.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *