काटेपुर्णेच्या जंगलात उगवली नैसर्गिक मशरूम रानभाजी.

 काटेपुर्णेच्या जंगलात उगवली नैसर्गिक मशरूम रानभाजी.

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पावसाळ्यात निसर्गात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवत असतात. मुख्यतः श्रावणात या रानभाज्यांचा आहारात समावेश केला जातो. वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलात मशरूम प्रवर्गातील ‘टेकोळे’ ही रानभाजी उगवली आहे. मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ किंवा टेकोळे असे ही म्हटले जाते.

पावसाची हजेरी लागताच खवय्यांना जंगली मशरुमची ओढ लागते. जंगलव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीनं हे मशरुम नैसर्गिकरित्या उगवते, याची कुठेही लागवड केली जात नाही. ग्रामीण भागात सकाळी मशरूम शोधून आणण्यासाठी जंगलात जात आहेत. घरगुती वापराबरोबर बाजारपेठेतही या नैसर्गिक मशरूमला मागणी आहे. A natural wild mushroom grown in the forests of Katepurna.

ML/KA/PGB
10 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *