‘जयोस्तुते’ कार्यक्रमातून सावरकरांना सांगितिक अभिवादन

 ‘जयोस्तुते’ कार्यक्रमातून सावरकरांना सांगितिक अभिवादन

नाशिक, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंती निमित्ताने आयोजित महाराष्ट्र शासन पर्यटन मंत्रालय,आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत काल सायंकाळी ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम भगूरच्या ” भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह” यांच्या वतीने भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला..नाशिक
येथील प्रसिद्ध गायक दंपती प्रसाद गोखले आणि वीणा गोखले तसेच त्यांचे सहकारी यांनी सादर केला. ज्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखीत तसेच त्यांच्या जीवनावरील गौरवपर गीतांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात “स्वातंत्र्य वीरा तुझी आरती” ह्या सावरकरांच्या आरतीने प्रसाद आणि वीणा गोखले यांनी केली. त्यानंतर वीणा यांनी “काळोख अंधार परवशता माथी ” हे गीत सादर केले. कार्यक्रमात यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावरकर लिखीत दोन आरत्या “जय देव जय देव जय जय शिवराया” आणि “हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” सादर केल्या. यानंतर “मर्मबंधातली ठेव ही” तसेच “शत जन्म शोधिताना” ही नाट्यपदे सादर केली ज्यांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

पुढे सावरकर लिखीत “अनादी मी अनंत मी” ह्या गीताचे अतिशय जोरकस गायनाने प्रसाद यांनी वातावरण वीर रसाने भरून टाकले. यानंतर “हम ही हमारे वाली है ” ही सावरकर लिखीत गझल सादर करण्यात आली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता “जयोस्तुते ” या गीताने करण्यात आली.. सावरकरांना अभिवादन करण्यात आले. प्रा पंकज नागमोती यांनी आपल्या निवेदनातून सावरकरांचा जीवनपट उलगडून सांगितला. कार्यक्रमात सहभागी कलाकार तबला : गौरव तांबे , कीबोर्ड : जितेंद्र सोनावणे, तालवाद्य : सागर मोरस्कर आणि स्वप्निल देशपांडे यांनी उत्तम साथ संगत करत कार्यक्रमाची उंची वाढवली. ध्वनी व्यवस्था : पुष्कर जोशी यांनी सांभाळली.

SL/KA/SL

22 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *