दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पेटले

 दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पेटले

सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जत तालुक्यात विजापूर गुहागर महामार्गावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर टायर पेटवून काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

जत तालुक्यात झालेली दुष्काळाची सदृश परिस्थिती यांच्यावर शासनाला जागा आणण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे. या जत तालुक्यात संपूर्ण खरीप पीक वाया गेलेले आहे. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, प्रामुख्याने जनावरांना आता चारा उपलब्ध झाला पाहिजे. ताकारी – म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज जत येथे रास्ता रोको करण्यात आले . जर राज्य शासनाने वेळेत लवकर निर्णय नाही घेतला. तर हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने जत तालुक्यात करण्यात येईल असा इशारा आमदार विक्रम सावंत यांनी दिला.

15 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *