न्यूयॉर्क येथे उभे राहणार छत्रपती शिवाजी महाराज व सरदार महाजी शिंदे यांचे स्मारक
पुणे प्रतिनिधी: न्यूयॉर्क येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व येथील सरकार शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने न्यूयॉर्क अमेरिका येथे छत्रपती शिवाजी महाराज व सरदार महादजी शिंदे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शिंदे सरकार फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव शिंदे सरकार यांनी ही माहिती दिली. न्यूयॉर्कचे पोलीस अधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव घुले व त्यांच्या पत्नी शिल्पा घुले (मूळ राहणार अहिल्यानगर) नुकतेच पुण्यात आले होते. शिंदे सरकार फाउंडेशन व शिवप्रेमी नागरिकांनी या पती-पत्नी द्वयिंचा सत्कार केला. त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.
शिंदे सरकार फाउंडेशनच्या अध्यक्ष उत्तमराव शिंदे सरकार, सिंहगड रोपवे चे उदय शिंदे, पालिकेचे सहाय्यक अभियंता रितेश शिंदे, , आर . डी. पाटील ( संचालक , डी. वाय पाटील विद्यापीठ) , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, , उद्योजक दीपक घुले , उद्योजक आशिष संकपाळ , प्रतापसिंह कांचन ( छावा संघटना ) , मि. खान ( उपायुक्त , वस्तु व सेवा कर ) , डाॅ. वहाणे ( जेष्ठ अभियंता , पुरातत्व विभाग ) , कर्नल शिंदे , कर्नल नरूला , आदी यावेळी उपस्थित होते.
घुले दांपत्याने आपली न्यूयॉर्क येथील एक एकर जमीन छत्रपती शिवाजी महाराज व महादजी शिंदे सरकार यांच्या स्मारकासाठी देण्याचे जाहीर केले आहे. या दोन्हीही सेनानींच्या पुतळ्यांची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर करणार आहेत. एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान पुतळे प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम न्यूयॉर्क येथे शिवप्रेमींच्या उपस्थितीत होणार आहे.
शिंदे सरकार फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली हे स्वराज्य अटकेपार नेण्याचे त्यांचे स्वप्न मराठा सरदार महाजी शिंदे यांनी लाल किल्ल्यावर भगवा फडकावून पूर्ण केले. त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा जगभर आहेच ती स्मारकाच्या रूपाने पसरविण्याचे काम शिवप्रेमींनी हाती घेतले आहे. विविध पन्नस देशांमध्ये अशी स्मारक स्मारके उभारण्याचा संकल्प शिवप्रेमींचा आहे.’
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव घुले म्हणाले, “मराठी माणूस जगभर विखुरलेला आहे अमेरिकेमध्येही मोठ्या संख्येने मराठी माणूस आहे आम्ही दरवर्षी न्यूयॉर्क येथे गेली वीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती व गणेशोत्सवासारखे अनेक सण समारंभ उत्साहात साजरे करतो. देशातील शिवप्रेमींनी दिलेल्या प्रतिसादामुळे या ठिकाणी स्मारकासाठी आम्ही एक एकर जागा देणार आहोत. याशिवाय पुढील काळात याच परिसरात शंभर एकर जमिनीवर शिवसृष्टी उभारण्याचाही आमचा प्रयत्न आहे.’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी यांनी केले.