जळगावात भीषण दुर्घटना, आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या चालत्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवल्याने अनेकांचा मृत्यू

 जळगावात भीषण दुर्घटना, आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या चालत्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवल्याने अनेकांचा मृत्यू

जळगावमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरून प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगावच्या परांडा स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर ट्रेनला आग लागली असं प्रवाशांना वाटलं त्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *