सुवाच्य प्रिस्क्रीप्शन हा रुग्णाचा मूलभूत अधिकार
मुंबई, दि. १९ : डॉक्टरांचे औषधांच्या प्रिस्क्रीप्शन वरील अगम्य हस्ताक्षर या नेहमीच चेष्टेचा आणि चर्चेचा विषय असतो. डॉक्टरांनी लिहून दिलेले वाचण्याचे काम फक्त केमिस्टच करू शकतात असेही म्हटले जाते. मात्र यामुळे रुग्णाला औषधाने नावच नीट न कळल्यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते, सुवाच्य प्रिस्क्रीप्शन हा रुग्णाचा मूलभूत अधिकार असे न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2025 मध्ये एनएमसीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नवे निर्देश जारी केले. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचता येईल असे लिहावे. शक्यतो मोठ्या कॅपिटल अक्षरात आणि जनरिक नावाने औषधे लिहावीत. अस्पष्ट प्रिस्क्रिप्शन स्वीकारले जाणार नाहीत. कारण ते रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात, असे एनएमसीने स्पष्ट केले आहे. हे नियम आधीपासून होते पण आता त्यांची कडक अंमलबजावणी होणार आहे.
एनएमसीने सर्व वैद्यकीय कॉलेजांना सूचना दिली आहे. त्यानुसार औषध आणि थेरपी समितीअंतर्गत उपसमित्या स्थापन कराव्यात. या समित्या प्रिस्क्रिप्शनची नियमित तपासणी करतील, चुका शोधून सुधारणा सुचवणार आहेत. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमात स्पष्ट लेखनाचे महत्त्व आणि प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची योग्य पद्धत शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्लिनिकल प्रशिक्षणात याचा मुख्य भाग म्हणून समावेश करावा लागणार आहे.
या नव्या नियमांमुळे रुग्णांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन मिळू शकणार आहे. ज्यामुळे औषधांच्या चुका कमी होतील आणि उपचार सुरक्षित होतील. या दरम्यान डॉक्टरांन अधिक सावध राहावे लागेल आणि भविष्यातील डॉक्टर चांगले प्रशिक्षित होतील. एकूणच आरोग्य सेवेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
SL/ML/SL