लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

नागपूर दि २– बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूरात तान्हा पोळा ( लाकडी बैल पोळा ) साजरा करण्यात येत असतो. नागपूरात लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केलेली दिसत आहे. करोडो रुपयांची उलाढाल तान्हा पोळा (लाकडी बैल) खरेदी विक्रीच्या माध्यमातून नागपूरात होत असते. बाजारात 100 रुपयांपासून ते लाखों रुपयांचे लाकडी बैल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांमध्ये प्राण्यांप्रती आपुलकी, जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने तान्हा बैल पोळा साजरा करण्यात येत असतो.