नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त पंढरपुरात भाविकांची हाउसफुल गर्दी
पंढरपूर दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाताळच्या निमित्ताने आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची हाऊसफुल गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ ,धर्मशाळा, लॉज हे पूर्ण क्षमतेने भरले असून विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग ही सुमारे चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोडच्या पत्रा शेड पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणतः पाच तासांचा कालावधी लागत आहे.
तब्बल दोन वर्षांनी नाताळ व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. मंदिरे समितीकडून दर्शनाची व्यवस्था सुयोग्यरीत्या करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.
ML/KA/SL
25 Dec. 2022