एक हटके रेसिपी, ओर्चाटा

 एक हटके रेसिपी, ओर्चाटा

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

लागणारे जिन्नस: 

बासमती तांदुळ – पाव कप
बदाम – 3-4 (अलर्जी असेल तर स्किप करा)
पाणी – 3 कप
दूध – एक कप
दालचिनी पावडर – 1 टीस्पून
वनिला एक्सट्रॅक्ट – 1 टीस्पून
जायफळ – उगाळून 1 टीस्पून (नाही घातले तरी चालेल)
साखर – पाव कप (आवडीनुसार कमी जास्त करा)

क्रमवार पाककृती: 

1. तांदूळ आणि बदाम एक कप पाण्यात चार ते पाच तास भिजवून ठेवा.
2. ब्लेंडर मध्ये भिजलेले तांदूळ आणि बदाम घालून वाटून घ्या. मग त्यातच 3 कप पाणी घालून परत ब्लेंड करा.
3. तयार मिश्रण एका जगमध्ये गाळून घ्या. आता त्यात दूध, साखर, वनिला, दालचीनी आणि जायफळ घालून साखर विरघळेपर्यंत ढवळून फ्रीजमध्ये ठेवा.
4. गार झाल्यावर, एका ऊंच ग्लासमध्ये बर्फाचे तीन चार खडे टाकून त्यावर ओतून सर्व करा.. गार्निशिंगसाठी एक पुदिन्याची काडी ठेवा..

A hotkey recipe, Orchata

PGB/ML/PGB
13 Oct 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *