५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

 ५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही वर्षापासून अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने देवून देखील अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. न्याय न मिळाल्यास जुलैमध्ये मुंबई येथे मोर्चा काढण्याचा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला होता. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात उमेद च्या महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना उमेद च्या प्रलंबित मागण्यांसाठी पाच लाख महिला बुधवारी मुंबई मंत्रालयावर महा मोर्चा काढून आझाद मैदान सभा घेणार आहेत.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानास ग्रामीण विकास व पंचायत राज विभागा मधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता देणे. व त्याअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. प्रभाग संघा वरील केडर कृषी व्यवस्थापक पशू व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधन करणे बाबत. गाव स्तरावर उपजिविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धनिना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. समुदाय स्तरीय संस्थांना सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी व पदाधिकारी यांना मासिक बैठकीसाठी प्रवास उपस्थिती भत्ता देण्यात यावा. अशी मागणी संघटनेची आहॆ.

A grand march of 5 lakh women will strike Mantralaya tomorrow

ML/ML/PGB
13 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *