विठ्ठलास ८२ तोळे वजनाची सोन्याची घोंगडी अर्पण

सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबाला तब्बल ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबास दिली आहे.
या घोंगडीची बाजार भावानुसार तब्बल ५१ लाख ९८ हजार इतकी किंमत आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला घोंगडीत लोकरीच्या असणारा पोशाख आता सोन्याच्या घोगडीत भक्तांना पहायला मिळेल. या भाविकांने यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे दान विठोबास नाव न करण्याच्या अटीवरून दिले आहे.
ML/KA/SL
26 Jan. 2024