सोलापुरात 500 एकर जागेवर उभारणार वन उद्यान
सोलापूर दि २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर शहरामध्ये वनविभागाच्या ताब्यात असणाऱ्या पाचशे एकर जागेमध्ये आता वन उद्यान उभा केले जाणार आहे. याबाबतची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केली.
सोलापूर शहरातील वाढत्या उन्हाळ्यामध्ये सोलापूरकरांना एक ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प म्हणून 500 एकर जागेवर वन उद्यान उभारले जाणार आहे. यासाठी लोकांनी देखील सूचना शासनाकडे द्याव्यात. शासन आणि लोकसहभाग या माध्यमातून वन उद्यान विकसित केले जाईल. असा आशावादही यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी जगदंबा अर्थात भवानी तलवार आणि वाघनख हे इंग्लंड हून भारतात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मे महिन्यामध्ये ब्रिटनमध्ये याबाबत बैठक असून लवकरच महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्तांना दर्शनासाठी जगदंब तलवार आणि वाघनख उपलब्ध होतील. असा विश्वासही यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.
ML/KA/SL
26 April 2023