भर समुद्रात मच्छीमारांच्या नौकेने घेतला पेट
देवगड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवगड येथील भर समुद्रात आज मच्छीमार नौकेला लागण्याची थरारक घटना घडली आहे. देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली गणपत निकम यांची पुण्यश्री नौका २२ वाव खोल समुद्रात मच्छीमारी करत होती. यावेळी अचानक नौकेने पेट घेतल्याने नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास मच्छिमार बांधवांना यश आले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. नौकेवरील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दोन नौकांच्या सहाय्याने नौकेला देवगड बंदरात आणण्यासाठी इतर मच्छीमार बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केले.
SL/KA/SL
25 Dec. 2022