या महिला सहकारी पतसंस्थेत झाला ४८ कोटींचा गैरव्यवहार

 या महिला सहकारी पतसंस्थेत झाला ४८ कोटींचा गैरव्यवहार

छ. संभाजी नगर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर जिल्हा यशस्विनी सहकारी पतसंस्थेमध्ये ८८ कोटी व्यवहारापैकी ४८ कोटी गैरव्यवहार असल्याचं समोर आले आहे. या बँकेवर १० डिसेंबरपासून प्रशासक देखील नेमण्यात आले असून याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. संचालक आणि अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे.

या पतसंस्थेच्या १८ शाखा आहेत, या १८ शाखेमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आता नागरिकांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काल प्रशासकाला जाब विचारत बँकेसमोर गोंधळ घातला. आमची पुंजी आम्हाला परत मिळावी, अशा नागरिकांच्या भावना आहेत. वेगवेगळ्या नावाने या बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. परंतु यशस्विनी पतसंस्थेच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य हे एकाच घरातील आहेत. वडील संचालक मंडळातील सल्लागार, आई अध्यक्ष , मुलगा सचिव असल्याचं सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्हा यशस्विनी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष हा आदर्श बँकेच्या व्यवस्थापक होता. आदर्श बँकेचा व्यवस्थापक होता. आदर्श बँकेत २०० कोटींचा घोटाळा झाला होता. आता ज्या बँकेत तो अध्यक्ष होता त्याच बँकेत घोटाळा झालाय. यशस्विनी सहकारी पतसंस्थेचे ८ ते ९ हजार किंवा त्याहून खातेदार आहेत. तर या पतसंस्थेच्या १८ शाखा असून यात सर्वाधिक खातेधार महिला आहेत. त्याचा पैसा या बँकेत अडकलाय.

महिलांनी एक-एक रुपये करत पैसे जमा करून या बँकेत ठेवले आहेत. परंतु आता पैसे मिळत नसल्याचं येथील खातेधारकांनी सांगितलं. या बँकेत प्रशासक नेमण्यात आलेत. खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशांचा जाब विचारल्यानंतर त्यावर त्यांनी कोणतेच उत्तर दिलेले नाही.

SL/KA/SL

19 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *