पोलीस अकादमीतच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

 पोलीस अकादमीतच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

पोलीस अकादमीतच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधून धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पिडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनीने नाशिक पोलीस अकादामीत साफसफाईचे कंत्राट घेतले होते. पोलीस अकादामीत साफसफाईचे कंत्राट घेतलेल्या कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेम संबंध होते. रविवारी 15 जुलै पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत शारिरीक संबंध ठेवण्यावरून संशयित आरोपी आणि पिडीत महिला यांच्यात भांडण झाले. त्यावेळी आरोपीने महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर आरोपीने रात्रभर महिलेला मारहाणही केली. तिचे व्हिडीओही काढले. या सर्व प्रकारानंतर आज सकाळीच महिलेने नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात तक्रार दाखल दाखल केली. एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

A female employee was raped in the police academy

ML/ML/PGB
16 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *