दुष्काळी भागात शेतकऱ्याने फुलवली केशर आंब्याची बाग
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील युवक शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत सेंद्रिय केशर आंब्याची बाग फुलवली. शिरापूर येथील शेतकरी सावनकुमार तागड या युवक शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. अल्प पाण्यावर हा प्रयोग केल्याने सफल झाला आहे.
उच्च शिक्षित असलेल्या या युवकाने दोन वर्षांपूर्वी हलक्या जमिनीत केशर जातीच्या अंब्याची लागवड केली. त्याला आता फळ लागले असून त्यातून वर्षाला 7 ते 8 लाखाचे उत्पन्न मिळत आहे. तागड यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीचा अवलंब केला आहे. पाणी बचतीसाठी त्यांनी ठिबक चा वापर केल्याने कमी पाण्यात ही बाग फुलविली आहे.
तागड यांच्या शेतात थेट ग्राहक येऊन बागेतून आंबे घेऊन जात असल्याने शेतकरी ते ग्राहक विक्री होत असल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे. गावाकडे आलेले बाहेरगावाचे नागरिक येथे येऊन आंबे घेऊन जात असल्याने वाहतुकीचा खर्च वाचत असल्याने तोही फायदा होत आहे.
ML/ML/SL
29 May 2024