ऊसदराची कोंडी फोडली एका गुऱ्हाळघराने…

 ऊसदराची कोंडी फोडली एका गुऱ्हाळघराने…

कोल्हापूर, दि. २३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : मजले (तालुका हातकंणगले) येथील भुधन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या गुऱ्हाळघराने ऊसाची पहिली उचल प्रतिटन ३१५० रूपये देण्याचे जाहीर करतानाच मागील हंगामातील उसाला १०० रुपये अधिक देण्याची केली घोषणा करून ऊसदर आंदोलनाची कोंडी फोडली आहे.

साखर कारखान्यांना हा आरसा असून त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

भुधन फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने मजले येथील तरूण शेतकरी एकत्रित येवून गु-हाळघर सुरू केले आहे. याठिकाणी गुळ पावडर आणि गुळाचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला या कंपनीने तालुक्यातील इतर कारखान्याप्रमाणे २९०० रूपये प्रतिटन दर दिला आहे. या कंपनीकडून गुळापासून कोणतेही उपपदार्थ तयार होत नसतानाही २९०० रूपये आणि संघटनेच्या मागणीप्रमाणे १०० रूपये दर जाहीर केला आहे. तसेच यावर्षी गाळपास येणा-या ऊसास प्रतिटन ३१५० रूपये दर जाहीर केला आहे.

याबाबत राजू शेट्टी म्हणाले, गु-हाळघरांचा उतारा १० टक्यापर्यंत असतो. त्यातून गुळ पावडर उत्पादन करून इतका दर देता येतो. तर मग साखर कारखान्यांना हा आरसा असून त्यांनी काबाड कष्ट करणा-या ऊस उत्पादक शेतक-यांच्या ताटात काय कालवले आहे, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

ML/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *