एका झाडामुळे शेतकरी एका रात्रीत झाला करोडपती

यवतमाळ, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लहरी निसर्ग आणि शेतमालाला कमी भाव यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा आयुष्यात आनंदाचा दिवस उगवणं आता अगदीच दुर्मिळ झालं आहे. मात्र यवतमाळ येथील शेतकऱ्याला वाडवडिलांना लावलेल्या एका झाडामुळे एका रात्रीत करोडपती होण्याची संधी देणारा चमत्कार घडला आहे.
यवतमाळचा एक शेतकरी एका रात्रीत करोडपती झाला आहे. विश्वास बसत नाही ना, पण खरं आहे. या शेतक-याच्या आजोबांमुळे या शेतक-याचं कुटुंब कोट्याधीश झालं आहे. शेतातील झाडामुळे या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचं झालं असं की यवतमाळच्या पासुद तालुक्यातील खर्शी गावात शेतकरी केशव शिंदे यांची 7 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. या शेतात त्यांच्या वडिलांनी एक रक्तचंदनाचं झाड लावलं होतं. वडिलांनी शेताच्या मधोमध लावलेलं हे झाड नेमकं कशाचं याची पुसटशी कल्पनाही 2014 पर्यंत केशव शिंदे यांना नव्हती.
यवतमाळच्या पासुद तालुक्यातील खर्शी गावात शेतकरी केशव शिंदे यांची 7 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. या शेतात त्यांच्या वडिलांनी एक रक्तचंदनाचं झाड लावलं होतं. वडिलांनी शेताच्या मधोमध लावलेलं हे झाड नेमकं कशाचं याची पुसटशी कल्पनाही 2014 पर्यंत केशव शिंदे यांना नव्हती.
वर्धा-यवतमाळ-पुसद- नांदेड ही रेल्वे लाईन शिंदेंच्या शेतातून जात असल्याने रेल्वेनं त्यांची जमीन संपादीत केली. संपादीत जमिनीचा मोबादला मिळाला, मात्र रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला न मिळाल्याने केशव शिंदेंचा मुलगा पंजाब शिंदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली. आणि अखेर 1 वर्षाने त्यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आलं.
शिंदे कुटुंबाकडून रक्तचंदनाच्या झाडाचं मुल्यांकन करण्यात आलं. यावेळी मुल्यांकनाप्रमाणे झाडाची किंमत 4 कोटी 94 लाख असल्याचं समोर आलं. मात्र रेल्वे विभागाने एवढी रक्कम देण्यास नकार दिला. 7 ऑक्टोबर 2024 रोजी पंजाब शिंदेंनी कोर्टात धाव घेतली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने झाडाचं मुल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या. मुल्यांकन होईपर्यंत कोर्टात 1 कोटी जमा करण्याचे आदेश देण्यात आले. 1 कोटींमधील 50 लाख काढायची परवानगी शिंदे कुटुंबाला देण्यात आली. रेल्वेनं मुदतीत मुल्यांकन न केल्यास उर्वरित 50 लाखही शिंदे कुटुंबाला मिळणार आहेत.