भेंडीची भाजी

 भेंडीची भाजी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

लागणारे जिन्नस: 

ताजी कोवळी भेंडी पाव किलो, भाजलेल्या धन्या-जिर्‍याची पूड एक टी स्पून. गरम मसाला एक टीस्पून, मीठ चवीनुसार, मूठ भर काजू, एक मध्यम कांदा( लाल – भारतातला) हिरवी मिरची दोन- तीन , फोडणीस तेल, हळद, हिंग जिरे व मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरायला.

क्रमवार पाककृती: 

भेंड्या पुसून लांब लांब कापून घ्या. एका भेंडीचे लांबी अनुसार करंगळी एवढे तुकडे करायचे मग ते अर्धे किंवा चार भागात कापायचे साइज अनुसार.

कांदा अर्धा कापून लांब लांब कापून घ्या.

मिरच्या पण लांब कापून घ्या.

काजू खलबत्त्यात अर्धवट ठेचून घ्या

आता गॅस मध्यम आचेवर ठेवुन फोडणीस तेल गरम करा व मोहरी जिरे, हिंग हळद, मिरची थोडी कापलेली कोथिंबीर हे सर्व घालून एकदा परता.
मग कांदा घालून एक दोन मिनिटे परतुन घ्या. फार ब्राउन करायचे नाही. कांदा फ्रें ड झोन मध्ये आहे. मग भेंड्या टाका व परतून घ्या. धने जिरे पूड गरम मसाला घालु न परतौन घ्या. तुमच्या पद्धतीने भेंडी शिजवून घ्या. मी दोन तीन मिनिटे झाक ण ठेवते. मग ओपन शिजवते. तार येत नाही पण खरपूस शिजते. व ह्यात काजूचे तुकडे घाला आणि कमी आचे वर थोडे परतत ठेवा. जळली नाही पाहिजे. चवी नुसार मीठ घाला घालत असल्यास चिमूट भर साखर घाला.

भाजी उतरवल्यावर अगदी थोडा लिंबू रस पिळून घाला व कोथिंबीर पेरून लगेच गरम पोळी बरोबर खायला घ्या.

A different method of cooking okra

PGB/ML/PGB
9 Oct 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *