जुन्या पेन्शन योजनेबद्दल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय

 जुन्या पेन्शन योजनेबद्दल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या सुबोधकुमार समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जात आहेत, त्यासाठी दोन वरिष्ठ अधिकारी नेमले असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केलं.

काल याबाबत कर्मचारी संघटनांशी चर्चा झाली असून त्यांना अहवालाबाबत माहिती दिली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ३१ मे २००५ पूर्वी जाहिरात देऊन नियुक्ती दिलेल्या पदांसाठी यात फायदा देण्यात येणार आहे त्याचा लाभ २६ हजार अधिकारी , कर्मचाऱ्यांना होईल असं मुख्यमंत्र्यानी आपल्या निवेदनात सांगितलं. इतर बहुतांश मागण्याही मान्य केल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले.

ML/KA/SL

14 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *