तीस फूट उंचीवर झाडावर आढळला मृत बिबट्या

 तीस फूट उंचीवर झाडावर आढळला मृत बिबट्या

चंद्रपूर,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात मागील महिन्यात आठवडाभराच्या काळात ३ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना जाती असताना आता एका बिबट्याच्या चमत्कारीक प्रकारे झालेल्या मृत्यूची घटना समोर आली आहे. हा बिबट्या ४० ते ४५ फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर ३० फूट उंचीवर एका फांदीवर मृतावस्थेत आढळला. ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील तळोधी नीयतक्षेत्रात ही घटना घडली आहे. हार्ट ऍटॅकमुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृत बिबट्या साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा असल्याचे लक्षात आले. बिबट्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे.

झाडावर एवढ्या उंचावर बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे या वनविभागाने या घटनेमागील कारणांचा शोध घेतला असता. ज्या झाडावर हा बिबट मृत होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याच्या खुणा आहे. झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदय हाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात आले.

तळोदी बाळापुरचे वन कर्मचारी हे सकाळी कॅमेरा ट्रॅपचे फोटो तपासायला गेले असता परिसरात दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता तळोदी गांगलवाडी रस्त्याच्या लगतच महसूल विभागाचे गट क्रमांक ६४ मध्ये ४० ते ४५ फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर ३० फूट उंचीवर एका फांदीवर बिबट मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तळोधी बाळापुरचे वन अधिकार अरुण कन्नमवार यांना देण्यात आली. माहिती मिळतात घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून बिबट्याचा मृतदेह खाली उतरविला.

ML/KA/SL

8 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *