नागपुरात अनुभवता आला शून्य सावलीचा दिवस
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावलोपावली सोबत असणारी आपली सावली वर्षातून दोन दिवस आपली साथ सोडते आणि आज तोच दिवस आहे आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी ते चित्र नागपुरातील रामण विज्ञान केंद्रामध्ये पहायला मिळालं.
विदर्भातील इतर जिल्ह्यातही ही स्थिती निर्माण होणार असली तरी अक्षाऊंश रेखांश नुसार दिवस वेगळे राहणार आहेत. सूर्य डोक्यावर आल्यानंतर ठराविक वेळेसाठी आपली सावली पायाखाली येऊन गायब होते. आपली सावली आपल्याला बघता येणार नाही वा दिसणार नाही .A day of zero shade was experienced in Nagpur
यंदा विदर्भात 26 ते 27 मे दरम्यान विविध ठिकाणी शून्य सावली अनुभवता येणार आहे. आज नागपूर मध्ये तोच दिवस अनुभवता आला. नागपुरातील रमण विज्ञान केंद्रामध्ये वेग वेगळ्या वस्तू अश्याप्रकारे ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सावली आपली साथ कशी सोडते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आणि या संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले .
ML/KA/PGB
26 May 2023