उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ विदर्भातून निघाली सायकल यात्रा

 उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ विदर्भातून निघाली सायकल यात्रा

वर्धा, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धातून निष्ठा यात्रा निघाली असून सायकलने 864 किलोमीटरचा प्रवास करत बेरोजगारी, महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर जनतेचे लक्ष वेधत ते मुंबईत पोहोचणार आहेत.A cycle trip started from Vidarbha in support of Uddhav Thackeray

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून सायकलने शिवसैनिकांची निष्ठा यात्रा निघाली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात आज वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही यात्रा निघाली. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी झाले असून वर्धा ते मुंबई 864 किलोमीटर अंतर कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे.

बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल आणि आरोग्याच्या समस्या यावर जनजागृती या यात्रेमधून करण्यात येणार आहे , शेवटी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हे सायकलपटू समर्थन देणार आहेत.

ML/KA/PGB
24 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *