कोकणचे निसर्ग वैभव जपणारा कृतिशील लेखक – प्रा. सुहास बारटक्के
कोकणचे निसर्ग वैभव जपणारा कृतिशील लेखक : प्रा. सुहास बारटक्के MMC -Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही कोकणातील चिपळूण येथील निसर्गप्रेमी प्रा. सुहास बारटक्के यांच्या संवाद साधला आहे. सरांनी लिहिलेल्या ३० हून अधिक पुस्तकांच्या पानापानांतून कोकणचे निसर्गसौंदर्य डोकावत राहते. कोकणातील आडवाटा, निसर्गातील अद्भुत रहस्य आणि कोकणची संस्कृती रसिक वाचकांपर्यंत पोहोण्याचे काम तीन दशकांपासून ते अव्याहतपणे करत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठीही त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे.चिपळूण येथील DBJ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत 30 वर्षांहून अधिक काळ अध्यापन कार्य करत असतात त्यांनी हा ग्रंथ फुलोरा साकारला. एक लोकप्रिय भाषाप्रेमी प्राध्यापक असा, नावलौकिकही त्यांना कमावला.कोकणाच्या प्रेमात आकंठ बुडालेले प्रा. बारटक्के गेली अनेक वर्षे कोकणात होत असलेल्या निसर्गरऱ्हासाबद्दल वृत्तपत्रांमध्ये वर्तमानपत्रातून सातत्याने आवाज उठवत आहेत. एक लेखक म्हणून प्रा. बारटक्के यांची जडणघडण, त्यांचे साहित्य, पत्रकारिता या साऱ्या बद्दल आम्ही या भागात त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. हा एपिसोड तुम्हाला काय वाटला , हे आम्हाला नक्की कळवा. MMC -Vartaman ला Like, Share आणि subscribe अवश्य करा.