तर कुलगुरू कार्यालयासमोर मनुस्मृतीची प्रत जाळली असती

 तर कुलगुरू कार्यालयासमोर मनुस्मृतीची प्रत जाळली असती

मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क): दिल्ली विद्यापीठाने विधी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना जातीयवादी, महिलाविरोधी मनुस्मृती शिकवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मला या निर्णयाचा आनंद असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, जर असे काही घडले नसते, तर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांवर पाऊल ठेवून दिल्लीत जाऊन कुलगुरू कार्यालयासमोर मनुस्मृतीची प्रत जाळली असती.

दिल्ली विद्यापीठाच्या एलएलबी विद्यार्थ्यांना ‘मनुस्मृती’ शिकवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवल्याच्या बातमीनंतर, विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले की सूचना नाकारण्यात आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना हस्तलिखित शिकवले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकरांनी प्रतिक्रीया दिली.

SW/ML/SL
12 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *