भगवान हनुमानासाठी या चित्रपटा दरम्यान एक खुर्ची रिकामी ठेवणार

 भगवान हनुमानासाठी या चित्रपटा दरम्यान एक खुर्ची रिकामी ठेवणार

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिथे रामनाम घेतले जाते, तिथे भक्तश्रेष्ठ हनुमान उपस्थित राहतात, अशी रामभक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळेच रामचरित मानस पठण आणि रामनाम सप्ताह अशा कार्यक्रमांमध्ये हनुमानासाठी एक बैठक रिकामी ठेवली आहे. आदिपुरुष या श्रीरामांचे चरित्र मांडणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शना दरम्यान याच प्रथेचे पालन करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. निर्मात्यांनी सांगितले की, ‘आदिपुरुष’ च्या स्क्रीनिंग दरम्यान, प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक सीट रिकामी ठेवली जाईल, कारण जिथे जिथे रामकथा होते तिथे हनुमान उपस्थित असतात. लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट चित्रपट महोत्सवात मिडनाईट ऑफरिंग म्हणून सादर केला जाणार आहे. त्याच वेळी, 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात’बाहुबली फेम प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतामाईची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

SL/KA/SL

6 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *