प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

 प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा याच्यासह त्याची पत्नी, फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई गुन्हे शाखेने व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची ११ कोटी ९६ लाख १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व्हि अनबिटेबल डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यावर कारवाई होत नसल्याने डान्सग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखा वसई युनिटचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी तपास करून अहवाल सादर केला. त्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्यात रेमो डिसुझावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेमो डिसोझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिझोझा, ओमप्रकाश चौहान, रोहित जाधव, फेम प्रोडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या ३२३, ४१९, ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व १२० (बी), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आता गुन्हे शाखा वसई शाखेचे वरिष्ठ शाहुराज रणावरे हे करत आहेत.

SL/ML/SL

18 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *