शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांंच्यावर गुन्हा दाखल

 शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांंच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : दादरच्या प्रभादेवी परिसरात काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झाला होता. गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, पण त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे पोलीस तपासातून समोर सिद्ध झाल्याने सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. “राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“त्याचप्रमाणे त्यांचं जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणं आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवलं. असं ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी लायसन्स आणि शर्थी नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

SL/KA/SL
25 March 2023

25 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *