दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल

अमरावती, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासंदर्भात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासह टीडीपी नेते आणि जनसेना पार्टीचे प्रमुख उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मॉर्फ्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
टीडीपी पार्टीचे नेते रामलिंगम यांनी प्रकाशम जिल्ह्यातील मद्दिपडू पोलिस ठाण्यात रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या वर आरोप आहे की त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मिनी सह परिवाराला टार्गेट करीत अपमानजनक मजकूर सोशल मिडीयावर शेअर केला. रामलिंगम यांनी रामगोपाल वर्मा यांच्या पोस्टमुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे उपमुख्यमंत्री तसेच कुटुंबियांची बदनामी झाली आहे असा आरोप केला आहे. प्रकाशम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक ए.आर.दामोदर यांनी या प्रकरणात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
राम गोपाल वर्मा हे वायएसआर कॉंग्रेस पार्टीशी जवळीक राहण्यासाठी चंद्राबाबूंवर वारंवार टीका करीत आहेत असा आरोप त्यांच्यावर होत आहे. सत्या, रंगीला आणि कंपनी यांसारखे सुपरहीट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा सोशल मिडियावरील पोस्टमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.