अनिल परब यांच्या सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल
दापोली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दापोलीतील साई रिसॉर्ट च्या कथित बेकायदा बांधकाम प्रकरणी काल पोलिसांनी माजी मंत्री अनिल परब यांचे मित्र सदानंद कदम यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.A case has also been filed against Anil Parab’s colleague
दापोलीतील मुरुड किनाऱ्यावर किनारा नियंत्रण नियमांचे अर्थात सी आर झेड चे उल्लंघन करून साई रिसॉर्ट चे बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणी पोलिसांनी याआधी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, परब यांनी हे रिसॉर्ट नंतर सदानंद कदम यांना विकले होते.
आता या प्रकरणात कदम यांनी परब यांना मदत करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करीत एम आर टी पी आणि पर्यावरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, याबाबतची तक्रार दापोलीचे मंडळ अधिकारी शरद सानप यांनी पोलिसात दिली होती.
ML/KA/PGB
17 Nov .2022