समृद्धी महामार्गावरील कार ने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू…

बुलडाणा, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एका कार ने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले .मुंबईवरून अकोला वाशिमच्या दिशेकडे जाणाऱ्या कारने बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड टोल जवळ आज सकाळी अचानक पेट घेतला या कार मधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीरित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली हा अपघात कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.