आसेतुहिमाचल जोडणारा सेतू…*भारतीय यात्रा परंपरा* – ओंकार जोशी- भारतविद्या अभ्यासक, चित्रकार, लेखक
MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही भारतविद्या अभ्यासक, चित्रकार, लेखक ओंकार जोशी यांच्याशी “भारतीय यात्रा परंपरा” या विषयावर संवाद साधला आहे.
आसेतुहिमाचल प्रचंड विस्तार असलेल्या आपल्या भारतभूमध्ये जळी,स्थळी,काष्ठी, पाषाणी देवस्थाने वसलेली आहेत. या क्षेत्रांना भेट देण्यासाठी हजारो वर्षांपासून तीर्थयात्रा केली जाते. यामुळे धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या आपला देश एकसंध राहण्यास मदत झाली आहे. हिमालयापासून रामेश्वरपर्यंत देशभरातील महत्त्वाच्या तीर्थयात्रांबद्दल आपण या मुलाखतीत जाणून घेतले आहे.
आत्मोनत्तीबरोबरच राष्ट्रोन्नतीसाठी तीर्थस्थळांचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. एपिसोड आवडल्यास Like करा, Share करा.
MMC -Vartaman Youtube चॅनलला सबस्क्राईब करा.