संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल

 संजय राऊत यांच्या घरी बॉम्बनाशक पथक दाखल

मुंबई, दि. ३१ : मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारपणातून उठून सक्रीय झाले आहेत. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे युती घडवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान आज भांडुपमधील संजय राऊत यांच्या घराबाहेर एक संशयित गाडी फिरताना आढळली. संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर ही धमकी देण्यात आली. या कारच्या काचेवर असणाऱ्या धुळीवर हाताने लिहिण्यात आलं आहे. यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हिंदी भाषेत ही धमकी देण्यात आली आहे. “आज हंगामा होगा. आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट होगा”, अशी धमकी देण्यात आली आहे.

या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची तात्काळ माहिती पोलीस विभागाला देण्यात आली असून, पोलीस आता घराभोवतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यारा देखील तपासत आहेत. तसेच, परिसरात सुरक्षेचा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, या वेळेस मुंबई पोलीस देखील राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. या अचानक घडलेल्या घटनांमुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार विशेष लक्षवेधी ठरला आहे

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *