भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ वर येतोय बायोपिक

 भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ वर येतोय बायोपिक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट टिममध्ये चैतन्य निर्माण करणारा, तुफानी खेळी आणि धडाकेबाज स्वभाव यामुळे प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली. क्रिकेटपट्टूमध्ये दादा म्हणून परिचित असलेल्या या क्रिकेटपट्टूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: गांगुलीनेच ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पश्चिम बंगालमधील बर्धमानमध्ये काल सौरव गांगुलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने बायोपिक येत असल्याबाबत माहिती दिली. तसेच या चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव हा त्याची भूमिका वठविणार असल्याचे गांगुलीने सांगितले. पण तारखांचा घोळ असल्यामुळे बायोपिक प्रदर्शित करण्यात वर्षभराहून अधिक काळ लागू शकतो, असेही गांगुलीने सांगितले.

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चांगले यश मिळवले होते. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व फॉरमॅटमध्ये एकूण १८,५७५ धावा केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषविलेले आहे.

SL/ML/SL

21 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *