घरगुती गॅसच्या किमतीत मोठी कपात

 घरगुती गॅसच्या किमतीत मोठी कपात

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीचा सण आता पंधरा-वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुशखबर दिली आहे. घरगुती गॅस एलपीजीच्या किमतीत २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या २०० रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त २०० रुपये वेगळे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर ४०० रुपयांची सूट मिळणार आहे

गेल्या काही दिवसांत सरकारने व्यावसायिक गॅसच्या किमतीत काही प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर सर्वसामान्यांना घरगुती गॅस कधी स्वस्त होणार याची वाट पाहत होते. सरकार गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा आढावा घेत आहे. त्याच्या किमतींबाबत पंतप्रधान कार्यालयातही आढावा घेण्यात आला आहे. एलपीजीच्या दरात कपात करण्यावर एकमत झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी त्याची घोषणा केली आहे.

२०० रुपये प्रति सिलिंडरच्या अतिरिक्त सबसिडीला मान्यता मिळाल्यामुळे सबसिडीचा भार केवळ ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर (OMCs) पडणार नाही. या अनुदानाचा भारही सरकार उचलणार आहे. सरकारवर किती बोजा पडेल आणि ओएमसीवर किती बोजा पडेल, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे सरकारवर ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

SL/KA/SL
29 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *