जालन्यातून रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचे मोठे आव्हान

 जालन्यातून रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचे मोठे आव्हान

जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलीय. मराठा आरक्षणामुळे भाजपचे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर मराठा आंदोलनाचे आव्हान वाढले आहे, जालना शहरातील चंदनझिरा येथील मराठा आंदोलक जगन्नाथ कारभारी चव्हाण हे दानवे यांच्या विरुद्ध दंड थोटून निवडणुकीला उभे राहणार आहे.सरकारने मराठा समाजाला उल्लू बनवलय, सरकार गाजर दाखून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याच यावेळी बोलतांना जगन्नाथ चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे न टिकणारे आरक्षण असून मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल एक शब्द बोलले,तर सर्व आमदार खासदार यांनी त्यांचं उचलून धरलं,पण मनोज जरांगे इतक्या दिवसांपासून आंदोलन,उपोषण करताय त्याची किंमत त्यांना नाही असा खेद त्यांनी बोलून दाखवला.जे नेते मराठा आरक्षणावर बोलले नाही, त्यांना मराठा समाज आगामी निवडणुकीत मतदान करणार नसून जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना गरजवंत मराठा समाज मतदान करणार नसल्याचं चव्हाण म्हणाले.

दरम्यान दानवे यांच्या विरूद्ध निवडणूक लढविण्यासाठी मराठा आंदोलक जगन्नाथ कारभारी चव्हाण हे स्वतः उभे राहणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आणखीन रंगतदार होणार असून मराठा आरक्षणामुळे सर्वच नेते आणि पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.दरम्यान जगन्नाथ चव्हाण हे दानवे यांच्या विरुद्ध निवडणुकीला उभे राहणार असल्याने दानवे यांच्या पुढे निवडून येण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. A big challenge from the Maratha agitators to Raosaheb Danve from Jalanya

ML/KA/PGB
6 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *