भुताटकीच्या संशयातून ७५ वर्षीय वृद्धाला निखाऱ्यावर नाचवलं

 भुताटकीच्या संशयातून ७५ वर्षीय वृद्धाला निखाऱ्यावर नाचवलं

मुरबाड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आधुनिक विचारांचा कालखंड सुरु झाला असला तरीही अजूनही आदिम अघोरी अंधश्रद्धेमुळे अमानवी कृत्य घडण्याच्या काही घटनाही घडत आहे. असाच एक अमानुष प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावात घडल्याचे उघडकीस आले आहे. गावात अघोरी कृत्य करून भूताटकी करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला आहे. लक्ष्मण असे होरपळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे.

दरम्यान, आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याने त्या ७५ वर्षीय वृध्द लक्ष्मण हे होरपळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला फोड होऊन ते गंभीर भाजले गेले. तसेच पाठीवरही भाजल्याच्या जखमा आहेत. याबाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली मात्र अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या संर्दभात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वयोवृद्ध कुटूंबासह राहतात. गावातील काही ग्रामस्थांना वृद्ध लक्ष्मण यांच्यावर संशय होता की, वृद्ध लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भूताटकी करतात. त्यातच ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केरवेळे गावात मंदिरासमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना गावातील १५ ते २० जण वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसले आणि त्यांना घराबाहेर ओढत नेले. त्यांना जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे त्यांना आगीच्या निखाऱ्यावर नाचविले. हा भयानक प्रकार घडत असतानाच, वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ‘तू करणी करतो’ असे म्हणून त्यांना मारहाण देखील करत होते. याप्रकरणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर होतो आहे.

SL/KA/SL

7 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *