20 वर्ष जुनी इमारत तडकली…सुदैवाने जीवितहानी नाही …
ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंबिवली पूर्वेकडील निळजे लोढा हेवन परिसरातील शांती उपवन कॉम्प्लेक्स मधील एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
इमारतीमधील रहिवाशांना जोरदार आवाज झाला त्यामुळे तात्काळ इमारतीमधील रहिवाशांनी इमारती बाहेर धाव घेतली त्यामुळे जीवित हानी टळली. शांतीवन ही कॉम्प्लेक्स सुमारे 22 वर्षे जुनी आहे या कॉम्प्लेक्स मध्ये 240 कुटुंब राहतात. तर तडा गेलेल्या विंग मध्ये 42 कुटुंब राहत होते सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले.
दरम्यान या इमारतींमधील कुटुंबांना आसपासच्या शाळा व समाज मंदिर हॉल मध्ये स्थलांतरित करण्यात आले असून सदर इमारत निष्कासित करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वतीने सांगण्यात आले आहेत.A 20-year-old building collapsed…fortunately there was no casualty…
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात शांती उपवन कॉम्प्लेक्स मध्ये एकूण पाच विंग असून हे कॉम्प्लेक्स 22 वर्ष जुने आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये एकूण 240 कुटुंब राहतात. आज रात्रीच्या सुमारास या कॉम्प्लेक्स मधील एफ विंग मध्ये जोरदार आवाज झाला. काही घरांमध्ये माती देखील पडली त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी इमारती बाहेर पळ काढला.
काही क्षणातच इमारतीला भला मोठा तडा गेल्याचं रहिवाशांना दिसून आलं. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन विभाग व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला तडा गेलेल्या या इमारतीमधील 42 कुटुंबांना सुखरूप घराबाहेर काढलं. त्यानंतर इमारत धोकादायक झाल्याने या कॉम्प्लेक्समधील सर्वच विंग मधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ही इमारत रिकामी करण्यात आली आहे.
सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत निष्कासित करणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान इमारती मधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या शाळा व समाज मंदिर हॉल मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारत पुनर्बांधणी करण्यासाठी संबधित बिल्डरकडे वारंवार मागणी केली मात्र संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय.
ML/KA/PGB
5 Mar. 2023