16 वर्षाच्या मुलीचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटर चे अंतर न थांबता पोहून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प सोलापूरची कन्या किर्ती नंदकिशोर भराडिया या 16 वर्षीय मुलीने केला आहे.हे अंतर पार करण्याकरिता किर्ती सलग 8 ते 10 तास समुद्रात पोहणार आहे.
अशी माहिती तिचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी प्रेस क्लब मध्ये पत्र बोलताना दिली. कीर्ती ही सकाळी 11 वाजता वरळी सी लिंक येथून पोहण्यास सुरुवात करेल व सायंकाळी अंदाजे 8 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचेल. या करिता किर्ती मागील 7 ते 8 महिन्यापासून मार्कडेय जलतरण तलाव, सोलापूर येथे नियमित 6-7 तास सराव करत आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासून ती मुंबई येथे समुद्रात सुद्धा पोहण्याचा सराव करीत आहे. हा विक्रम पूर्ण करण्याकरिता किर्तीला पोहताना समुद्रातील खारे व अस्वच्छ पाणी, ऊन, समुद्रातील उलट लाटा, लहान किडे, सायंकाळी अंधार अश्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
सरावा सोबत उत्तम आहार घेण्याकरिता डॉ. सोनाली घोंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोड आलेली कडधान्ये, ड्रायफ्रूट, पनीर, सोयाबीन दूध, पालेभाज्या यांचे सेवन ती नियमित करीत आहे. या विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी चे अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित रहाणार आहेत. सोलापूर चे सुप्रसिद्ध स्विमिंग व डायविंग चे कोच श्रीकांतजी शेटे सरांचे मार्गदर्शन प्राप्त होत आहे.भारताच्या सुप्रसिद्ध जलतरणपटू रुपाली रेपाळे व दिलीप कोळी हे किर्तीला प्रोत्साहन देत आहेत. “SAVE & SUPPORT GIRL CHILD” हे या इव्हेंटचे ब्रीद वाक्य आहे.A 16-year-old girl’s determination to set a world record या इव्हेंटचे आयोजन स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. असे नंदकिशोर भराडिया यांनी सांगितले.
ML/KA/PGB
21 Nov .2022