ओबीसींच्या हक्कांसाठी नागपूरात साखळी उपोषण सुरू
नागपूर दि २– मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू असून मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आणि अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटना सर्व जातीय संघटनेच्या वतीने नागपुरातील संविधान चौक येथे साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणाला तीन दिवस पूर्ण झाले असून साखळी उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.ML/ML/MS